Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!

जाहिरात

 

वीज कंत्राटी कामगार करणार मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण !! ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा !!

schedule01 Aug 24 person by visibility 1755 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आचारसंहितेची चाहूल लागल्यानंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता 12 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. 20 ऑगस्ट रोजी सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या दारात लाक्षणिक आंदोलन तर 24 ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदान ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत मोर्चा काढून तेथे वीज कंत्राटी कामगार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले
तीनही  वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबण्यासाठी  हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या 60 वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार मिळवा, मागणी पत्रका प्रमाणे वेतनात वाढ मिळावी, व प्रलंबित समस्यां सोडवाव्यात या मागण्या साठी हे आंदोलन असल्याचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कळवले. राज्यातील सर्व संघटना व कामगार यांनी या निर्णायक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटनमंत्री उमेश आणेराव यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes