Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवालकेआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेजना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !

जाहिरात

 

स्मॅक आयटीआयमध्ये दीक्षांत समारंभ उत्साहात,प्रशिक्षणाार्थ्यांना पुरस्कार वितरण

schedule27 Oct 24 person by visibility 964 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलींचा सहभाग वाढवावा तसेच व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुढे यावे असे आवाहन स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी केले.
  स्मॅक संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०२४ आयटीआय अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवसाय पूर्ततेची शासकीय प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा व संस्थेतील व्यवसायनिहाय यशप्राप्त  प्रशिक्षणार्थ्यांचा पुरस्कार वितरणाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्या प्रसंगी काढले.
या कार्यक्रमास स्मॅकचे माजी अध्यक्ष आर. बी. थोरात , निमंत्रित सदस्य प्रकाश चरणे, ज्येष्ठ उद्योजक तुकाराम पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी इलेक्ट्रिशियन , फिटर , मेकॅनिकल ड्राफ्ट्समन व वेल्डर या ट्रेड मधील प्रथम, द्वितिय, तृतीय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना गौरव सन्मानचिन्हे व शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रे ही देण्यात आली.
  याप्रसंगी स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके , स्मॅक संचालक राजू पाटील , शेखर कुसाळे , निमंत्रित सदस्य प्रकाश खोत , संजय भगत , विनय लाटकर , स्मॅक कमिटी सदस्य एम. वाय. पाटील उपस्थित होते.
 आयटीआयचे प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी  प्रास्ताविकात स्मॅक‌ औद्योगिक प्रशिक्षण संस्था १९९४ पासून सुरु असून आज संस्थेस तीस वर्षे पूर्ण झाली आहे व आज पर्यंत संस्थेतून १,८०० प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होऊन त्यातील शंभर विद्यार्थ्यांनी तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून ते उद्योजक बनले आहेत व अन्य विविध नामवंत कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आर. बी. थोरात म्हणाले, संस्थेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसहित एकत्र असा उद्योजक मेळावा आयोजित करावा व संस्थेतील अनुभवांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून घ्यावा. त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले.  वीजतंत्री निदेशिका स्नेहल धने व फिटर निदेशक प्रीतम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. बीटीपी चे वरिष्ठ निदेशक अण्णासो हसुरे यांनी आभार मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes