Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारजज डडदिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक

जाहिरात

 

बाळ घाटगे यांचे निधन

schedule24 Mar 24 person by visibility 1235 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रताप उर्फ बाळसाहेब शंकरराव घाटगे (वय ७३) यांचे निधन झाले.बाळ घाटगे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कारकीर्दीत गांधी मैदानात एक लाख मराठा मेळावा ८० च्या दशकामध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सर्वप्रथम मागणी झाली होती .
भगतसिंग तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून घाटगे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. १९७५ ते १९८५ या कालावधीत भगतसिंग तरुण मंडळाने घाटगे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर ते सातारा मोटरसायकल स्पर्धा, कोल्हापूर ते कराड सायकल स्पर्धा, कोल्हापूर ते अंबा सायकल शर्यत आयोजित करून घाटांचा राजा हा किताब दिला जात असे.
 खासबाग मैदानात त्यांनी पहिली बॉक्सिंग स्पर्धा आयोजित केली होती .१९९० मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ते शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष होते. त्यांनी महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी असा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवारी ( ता.२७) सकाळी नऊ वाजता होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes