महालक्ष्मी बँकेला शून्य टक्के एनपीए बॅँक पुरस्कार
schedule29 Sep 24 person by visibility 183 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी सहकारी बँकेला "शून्य टक्के एनपीए बँक पुरस्कार" देऊन पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशन कडून प्रदान करण्यात आला.
केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र किंकर ,उपाध्यक्ष सी ए. केदार हसबनीस ,संचालक प्रशांत कासार ,कृष्णा काशीद, सीईओ बी डी खरोशी यांनी स्वीकारला. २०२३-२४ या वर्षाकरिता शून्य टक्के एनपीए बँक पुरस्कार देण्यात आला. यावेळी भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे,सहकार आयुक्त दीपक तावरे, माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, प्रवीण दरेकर, विद्याधर अनासकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
श्री महालक्ष्मी को ऑप. बँकेचा व्यवसाय ९०० कोटींच्यावर असून सी आर ए आर २२.७५ टक्के इतका आहे, बँकेने शून्य टक्के एनपीए सातत्याने राखलेला आहे.