रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे वीस सप्टेंबरपासून यामिनी प्रदर्शन
schedule15 Sep 24 person by visibility 225 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २०,२१ व २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया हॉलमध्ये यामिनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे हे अकरावे वर्ष आहे. प्रदर्शनात १०० हून अधिक स्टॉल आहेत. अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा योगिनी कुलकर्णी, यामिनी इव्हेंट चेयर आरती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.यावेळी आमदार जयश्री जाधव,रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी उपस्थित असणार आहेत. प्रदर्शनात कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, याबरोबरच दिल्ली, बनारस, गोवा, मुंबई, पुणे बेळगाव आणि इतर विविध शहरातील व्यावसायिकांचा सहभाग आहे.ड्रेसेस, साड्या, लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह वस्तू, स्किन केअर प्रॉडक्ट, रियल ज्वेलरी व विणकारांकडून बनारसी व चंदेरी साड्या यांचा यात समावेश आहे.प्रदर्शन २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २१ व २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. कोल्हापूरवासियांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजने केले आहे.
दरम्यान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी क्लबच्या अध्यक्ष, सचिव यांच्यासह डॉ.हेमलता कोटकर, लक्ष्मी शिरगावकर, साधना घाटगे, कल्पना घाटगे, शोभा तावडे, ममता झंवर, रेणुका सप्रे, दीपिका कुंभोजकर, प्रीती मर्दा, प्रीती मंत्री, गिरीजा कुलकर्णी, मेघना शेळके प्रयत्नशील आहेत.