आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेत विवेकानंद कॉलेजचे यश
schedule14 Feb 25 person by visibility 205 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कश्मीर गुलमर्ग येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरच्या गायत्री लोळगे, बी.एस्सी. भाग 3 आणि कुमारी वैष्णवी पाटील (बीकॉम भाग दोन) यांनी शिवाजी विद्यापीठकडून प्रतिनिधित्व करत आईस स्टॉक खेळामध्ये टीम टार्गेट त्याचबरोबर टीम डिस्टन्स खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळविले. तसेच इंडिव्हिज्युअल डिस्टन्स या खेळ प्रकारात कुमारी गायत्री लोळगे हिला रौप्य पदक मिळाले. या स्पर्धांसाठी भारतामधून विविध विद्यापीठातून तब्बल ४५ विद्यापीठांचा समावेश होता.
यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. बी.जोग व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले