वीज कंत्राटी कामगारांतर्फे विजयी गेट मिटींग
schedule14 Sep 24 person by visibility 284 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना १९ टक्के वेतन वाढ एप्रिल २०२४ पासून लागू करण्याची घोषणा केली. या निमित्ताने आभार व्यक्त करण्यासाठी संघटनेने सर्व जिल्ह्यातील कार्यालयासमोर विजयी गेट मिटींग घेतली. याप्रसंगी ऊर्जामंत्री फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अपर प्रधान सचिव ऊर्जा आभा शुक्ला व तिन्ही वीज कंपनीच्या वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यांचे कामगारांनी आभार मानले.
हरियाना पॅटर्न नुसार वीज ऊद्योग कंत्राटदार मुक्त रोजगार करण्याचा सरकारने लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली. या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, अभय वर्तक, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, उमेश आणेराव , कोषाध्यक्ष सागर पवार, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, पुणे झोन सचिव निखील टेकवडे, चंद्रकांत नागरगोजे, योगेश महांगरे, दिपक सुतार, मार्गदीप मस्के श्रीमती रजनी काची, संगीता शेलार, कीरण हंचाटे आदी पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.