वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप चौगुले
schedule31 Jul 24 person by visibility 227 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील श्री वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त होते. त्या रिक्तपदासाठी निवड प्रक्रिया झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. निळकंठ करे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे यांनी अध्यक्षपदासाठी चौगुले यांचे नाव सुचविले. संचालक चंद्रकांत स्वामी यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी संचालक सुर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शंकुतला बनछोडे, महादेव साखरे, राजेंद्र शेटे, अनिल स्वामी, सतीश घाळी, वैभव सावर्डेकर, श्वेता हत्तरकी, राजेंद्र लकडे आदी उपस्थित होते.