क्रीडा सप्ताहनिमित्त शहाजी कॉलेजमध्ये विविध स्पर्धा
schedule28 Aug 24 person by visibility 223 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागमार्फत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (२९ ऑगस्ट) क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले. या क्रीडा सप्ताहातंर्गत बुधवारी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. के. शानेदिवाण यांनी केले. क्रीडा संस्कृती वाढावी व सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच शैक्षणिक ताणतणावातून मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास त्याचा महत्त्वाचा फायदा होईल असे प्रतिपादन प्राचार्य शानेदिवाण यांनी केले. यावेळी नॅक समन्वयक डॉ आर डी मांडनीकर, रजिस्टर रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील व प्रशांत मोटे यांनी केले