Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

जाहिरात

 

शाहूवाडीत दोन ग्रामविकास अधिकारी लाच घेताना पकडले

schedule12 Dec 24 person by visibility 925 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाहूवाडी तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन ग्रामविकास अधिकारी लाच घेताना पकडले. बांबवडे गावचे ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे व साळशी पिशवी येथील ग्रामविकास अधिकारी प्रथमेश डंबे यांच्यावर पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. मोरे आणि डंबे दोघेही जुने पारगाव येथील आहेत.

यातील तक्रारदारांचे सासरे हे बांबवडे गावचे रहिवासी होते. सासऱ्याचा मृत्यूचा दाखला व राहत्या घराचा घरटाण उतारा मिळावा म्ह्णून ग्रामविकास अधिकारी मोरे यांच्याकडे मागणी केली होती. मात्र दाखला देण्यासाठी मोरे यांनी टाळाटाळ केली. महिनाभर पाठपुरावा करुनही दाखला मिळाला नाही. तक्रारदारांनी, मोरे यांची भेट घेतल्यावर वीस हजार रुपयांची मागणी केली. त्यामध्ये तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यानुसार बुधवारी सापळा रचला. पंचायत समिती शाहूवाडीसमोर ग्रामविकास अधिकारी मोरे व साथीदार साळशी-पिशवीचा साथीदार प्रथमेश डंबे पोहोचले. मोरे यांनी लाच म्हणून मागितलेले पैसे डंबे यांनी स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes