कोल्हापुरात आजपासून तीन दिवसीय स्त्रीरोग तज्ज्ञांची परिषद
schedule22 Nov 24 person by visibility 97 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसूतीतज्ज्ञ संघटना व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संघटनेतर्फे २२ ते २४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तीन दिवसीय वैद्यकीय परिषद होत आहे. हॉटेल सयाजी येथे या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेची माहिती कोल्हापूर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर्स संघटनेचे सचिव डॉ. इंद्रनील जाधव यांनी दिली.
परिषदेत स्त्रीरोग उपचार सुविधा, मुली व स्त्रियांच्या विविध वयोगटातील आरोग्य समस्या व अत्याधुनिक उपचार पद्धती विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत विविध जिल्ह्यातून ३०० हून अधिक डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन शनिवारी, (२३ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता आहे. हैदराबाद येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.एव्हीटा फर्नांडिस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. याप्रसंगी त्यांचे ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ या विषयावर व्याख्यान आहे. या परिषदेतंर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे राज्यात प्रथमच रोबोटिक व थ्रीडी लॅप्रोस्कोपीचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रसाद हलकर्णीकर, उपाध्यक्ष डॉ. मनीषा नागांवकर, डॉ. गौी साईप्रसाद, खजानिस डॉ. रणजीत किल्लेदार, सहसचिव डॉ. अपर्णा कौलवकर आदी प्रयत्नशील आहेत.