Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्ञानेश्वर मुळे, विठ्ठलराव याळगींना पुरस्कार ! रविवारी वितरण समारंभ !!डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुकएक जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमू धावणार नव्या वेळेनुसार

जाहिरात

 

वसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले

schedule17 Sep 24 person by visibility 187 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे भरीव कार्य वसंतराव देशमुख यांनी केले. संस्थाचालकांचे वाद सोडविले. त्यांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले.’अशा शब्दांत आमदार जयंत आसगावकर यांनी आदरांजली वाहिली.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्था चालक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी प्रसारक शिक्षण मंडळाचे संस्थापक वसंतराव देशमुख यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. आमदार आसगावकर हे शोकसभेच्या अध्यक्षस्थानी होते. राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या सभेत अनेकांनी, मनोगतादरम्यान वसंतराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत शैक्षणिक, संघटनात्मक पातळीवरील कामाचा अनुभव शेअर करताना अनेकांना गहिवरुन आले.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा पट उलगडला. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे, शिवाजी माळकर, सी. एम. गायकवाड, सुनील कुरणे, विलास पोवार, सुभाष जाधव, विष्णू पाटील, रणजित देवाळकर, आर. बी. पाटील, बाबा पाटील, सविता काळे, उमेश देसाई यांनी देशमुख यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार,इरफान अन्सारी, उदय पाटील, के के पाटील, सुधाकर निर्मळे, सयाजी पाटील, गजानन काटकर, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes