बह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जयंत्युत्सवाला प्रारंभ
schedule03 Feb 25 person by visibility 105 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सद्गुरू ब‘ह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जयंत्युत्सवाचा प्रारंभ कपिलतीर्थ येथील पादुका मंदिरात झाला. दोन ते नऊ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा उत्सव होत आहे. या उत्सवात भक्तांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबुराव ठाणेकर यांनी केले आहे.
१९२० मध्ये कपिलतीर्थ येथील ठाणेकरांच्या वास्तूत श्री ब‘ह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून प्रतिवर्षी महाराजांची पुण्यतिथी, गुरुपौर्णीमा आणि जयंत्युत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध द्वादशी असा जयंत्युत्सव चालतो.
या वर्षी या उत्सवामध्ये रोज सायंकाळी साडेसहा वाजता गजानन बुवा वठारकर यांचे कीर्तन आणि रात्रौ ९.३० वाजता गायन सेवा होणार आहे. गायन सेवेमध्ये, स्वरब‘म्ह प्रस्तुत गीत रामायण, श्री महाद्वार स्वामी सेवा भजनी मंडळाचे भजन; मधुसूदन शिखरे, नितीन मुनिश्वर यांची भावगीते, भक्तिगीते आणि कैवल्य ठाणेकर यांच्या बासरी वादनाचे कार्यक‘म आयोजित केले आहेत. रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजता जन्मा‘यानाचे कीर्तन होणार आहे. सकाळी नऊ वाजता जन्मकाळ होणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२.३० नंतर महाप्रसाद होणार आहे. सर्व सांप्रदायिक मंडळीनी या उत्सवात सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणेकर कुटुंबियानी केले आहे.
प्रति,
मा. संपादकसो,
दै. कृपया प्रसिद्धीसाठी आणि दै. कार्यक‘मात उल्लेखासाठी
आपला,