कोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार !
schedule17 Sep 24 person by visibility 343 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची १११ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. बँकेचे उपाध्यक्ष जयसिंग माने हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी, बँकेने अहवाल सालात केलेल प्रगतीचा आलेख सभासदासमोर मांडला. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभासदांना भागभांडवलापोटी दहा टक्के लाभांश वितरित करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर लाभांश वाटप करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्य कार्यकरी अधिकारी रामदास वाडकर यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. बँकेचे सभासद प्रकाश जाधव, रवींद्र कदम, पांडूरंग चव्हाण, शामराव खोत, पंडित कंदले, प्रा. रुपा शहा, बाबा वाघापूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरव्यवस्थापक सत्यजित जगदाळे यांनी उत्तरे दिली. सभेदरम्यान सभासद व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव झाला.
सभेला बँकेचे संचालक नामदेव कांबळे, यशवंत साळोखे, विश्वास काटकर, राजन भोसले, सुभाष भांबुरे, अॅड. रवींद्र धर्माधिकारी, अॅड. प्रशांत शिंदे, नंदकुमार मकोटे, संभाजीराव जगदाळे, अभिजीत मांगुरे, संध्या घोटणे, दीपक चव्हाण, दिलीप फडणीस, सुबराव पवार, ऋषिकेश केसकर आदी उपस्थित होते. संचालक मधुसूदन सावंत यांनी आभार मानले.