तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानामाला २८ नोव्हेंबरपासून, सात दिवस विविध वक्त्यांची व्याख्याने
schedule27 Nov 24 person by visibility 102 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते चार डिसेंबर २०२४ या कालावधीत तात्यासाहेब तेंडुलकर स्मृति व्याख्यानमाला आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे यंदा २४ वे वर्ष आहे.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, बँकेचे अध्यक्ष राजेंद्र किंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये या व्याख्यानमालेची माहिती दिली. २८ नोव्हेंबर रोजी अभिनेता हृषिकेश जोशी यांचे ‘कलेची ऐतिहासिक पंढरी’ या विषयावर, शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी पत्रकार प्रशांत दिक्षीत यांचे ‘२०२४ विधानसभा निकालाचा अर्थ काय ?’ या विषयावर व्याख्यान आहे. शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे ‘माझ्या मराठीचे बोलू कौतुके’ या विषयी तर रविवारी, एक डिसेंबर रोजी अॅड युवराज नरवणकर यांचे ‘प्राचीन भारतातील कायदे-न्यायव्यवस्था आणि सद्यस्थिती’ याविषयी व्याख्यान आहे.
सोमवारी, दोन डिसेंबर रोजी डॉ. पंडित संदीप अवचट यांचे ‘शास्त्रामागील विज्ञान’ या विषयावर व्याख्यान आहे. मंगळवारी तीन डिसेंबर रोजी मंगला गोडबोले यांचे, ‘मला उमगलेले-पु.ल. आणि सुनीताबाई’, तर बुधवारी चार डिसेंबर रोजी सुमेधा चिथडे यांचे ‘राष्ट्रीय स्वाहा इदं न मम:’या विषयावर व्याख्यान आहे. ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी सहा वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथील सभागृह येथे होणार आहे.
पत्रकार परिषेदला मंगलधामचे पदाधिकारी श्रीकांत लिमये, संतोष कोडोलीकर, अॅड. विवेक शुक्ल, बँकेचे उपाध्यक्ष केदार हसबनीस, संचालक विनोद डिग्रजकर, प्रशांत कासार, डॉ. रुपा नागावकर आदी उपस्थित होते.