कोल्हापुरात तीस ऑगस्टपासून राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा
schedule27 Aug 24 person by visibility 271 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चेस असोसिएशन कोल्हापूरतर्फे अकरा वर्षाखालील व एकोणवीस वर्षाखालील मुला-मुलींची राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनीष मारुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेसाठी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम व शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीचे सहकार् लाभल्याचे त्यांनी सांगितले. तीस ऑगस्टपासून या स्पर्धा होणार आहेत.
या दोन निवड स्पर्धा पैकी प्रथम एच् टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा ३० ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे होणार आहे.त्यानंतर एच् टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनियर (१९ वर्षाखालील) मुला-मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान , मांगल्य मल्टीपर्पज हॉल, ताराबाई पार्क येथे होणार आहे.एच् टू ई पॉवर सिस्टिमस् ही कंपनी प्रत्येक महाराष्ट्र निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आहे.दोन्ही स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील फक्त निवड झालेल्या खेळाडूंची रहाण्याची व्यवस्था मोफत केली आहे.
पत्रकार परिषदेला स्पर्धा संचालक धीरज वैद्य, ब्राह्मण सभा करवीर चे अध्यक्ष संतोष कोडोलीकर, कार्यवाह श्रीकांत लिमये, खजिनदार रामचंद्र टोपकर, सहयोगी सदस्य एन. ए. कुलकर्णी, अनिश गांधी व प्रशांत पिसे उपस्थित होते