श्री महालक्ष्मी अन्नछत्राच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule04 Feb 25 person by visibility 103 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ४७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ताराबाई रोडवरील श्री महालक्ष्मी धर्मशाळेत शिबिर झाले.
संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी संजय जोशी, राजेश सुगंधी, एस. के. कुलकर्णी, सुनील जोशी, अॅड. तन्मय मेवेकरी, वैभव कणसे, हर्षदा मेवेकरी आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र, श्री महालक्ष्मी धर्मशाळा व धनलक्ष्मी पतसंस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला संस्थेतर्फे महालक्ष्मी हेल्थ चेकअप कार्ड देण्यात आले. या कार्डद्वारे रक्तदाते व त्यांच्या कुटुबीयांना सर्व तपासण्यावर पंचवीस टक्के सवलत मिळते.संस्थेतर्फे गेली दहा वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.