तळसंदेतील डीवाय पाटील डेअरी फार्म-मुक्त गोठा पाहून शरद पवार प्रभावीत
schedule04 Sep 24 person by visibility 9944 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कृषी क्षेत्र व उच्च शिक्षणाची आस्था असलेल्या कोल्हापुरातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक दृष्टी देण्याचे काम डी. वाय. पाटील ग्रुपने केले आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळसंदे येथे काढले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी बुधवारी दुपारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीला भेट दिली. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, फार्म हेड प्रा. अमोल गाताडे उपस्थित होते.
डॉ. संजय डी. पाटील यांनी तळसंदे येथे सुरू असलेली विविध महाविद्यालये व प्रकल्पांची माहिती पवार यांना दिली. डी वाय पाटील डेअरी फार्म व मुक्त गोठा पाहून पवार प्रभावीत झाले. येथील विविध गाई व म्हशींच्या जातींबद्दल व कृषी पदार्थांबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी डॉ. पाटील व प्रा. गाताडे यांच्याकडून जाणून घेतली. स्मृती उद्यान येथील यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पवार यांनी अभिवादन केले. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यापीठाच्या कामगिरीची माहिती दिली
डॉ. संजय डी.पाटील यांच्या निवासस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांची भेट घेतली. यावेळी यावेळी ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांनी श्री पवार यांना डी वाय पाटील ग्रुप विस्तार, विविध संस्था व कार्याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. याप्रसंगी शांतादेवी डी. पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, व्ही. बी पाटील, माजी कुलगुरू डॉ. शैलेश पाटील, डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डी.एन शेलार, प्रा. पी एस पाटील, डॉ. जयेंद्र खोत, डॉ. व्ही. व्ही. भोसले, सुजित सरनाईक, प्राचार्य डॉ.महादेव नरके, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. शिम्पा शर्मा, डॉ. अजित पाटील, डॉ. उमाराणी उपस्थित होते.