+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा adjustप्रशासकीय कामकाजाला हवा माणुसकीचा चेहरा !
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule10 Jul 24 person by visibility 213 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ज्येष्ठ संघटक पुरस्कार जाहीर झाला आहे. कबड्डी, खेळाडू व संस्था यांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या खेळाडू व संघटकांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार दिला जातो. पाटील यांचे वडणगे येथील जय किसान क्रीडा मंडळ या संस्थेच्या स्थापनेत योगदान आहे. या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविले आहेत. हा पुरस्कार वितरण समारंभ कबड्डीदिनाचे औचित्य साधून १५ जुलै रोजी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे पुणे येथे कार्यक्रम होणार आहे.