मुख्याध्यापक शिवाजी कोरवी यांची निवड
schedule27 Sep 24 person by visibility 656 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महमंडळ मुंबईच्या कार्यकारिणी सदस्यपदी रजपूतवाडी येथील मुख्याध्यापक शिवाजी यल्लाप्पा कोरवी यांची निवड झाली. ते, रजपूतवाडी येथील माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्याध्यापक आहेत. या निवडीबद्दल त्यांचा, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने, अरुण थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष दत्तात्रय घुगरे यांच्या दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव आर. वाय. पाटील, श्रीकांत पाटील, दत्ता पाटील, दीपक पाटील, सुधाकर जगदाळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक कोरवी यांना दलितमित्र व्यंकाप्पा भोसले व प्रा. सुनील भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.