स्मॅकचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, वर्षभर विविध उपक्रम ! औद्योगिक फेडरेशन स्थापण्याचा विचार !!
schedule12 Feb 25 person by visibility 117 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन अर्थात स्मॅक या औद्योगिक संस्था. यंदा ही संस्था ४९ वर्षे पूर्ण करुन ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. स्मॅकच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम साजरे होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा, उद्योग मंत्री, विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्योग परिषदेसंबंधी विचारविनिमय करण्यात आला.
या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी सुवर्णमहोत्सव समिती व निमंत्रित सदस्यांची नेमणूक करण्यात आली. स्मॅक सुवर्णमहोत्सव समितीचे चेअरमन सुरेन्द्र जैन हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. स्मॅक भवन येथे बैठक पार पडली. दरम्यान सुवर्णमहोत्सव समिती सदस्य म्हणून एम. वाय. पाटील, सचिन मेनन, प्रताप पुराणिक, जी. बी. वझे, जयंतीलाल शहा, देवेंद्र उबेरॉय, नेमचंद संघवी, आप्पासो हजारे तसेच निमंत्रित सदस्य हरिश्चंद्र धोत्रे, प्रदीप कापडिया यांचा समावेश आहे.
सुरेन्द्र जैन, कोल्हापूर मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे परिक्रमा खंडपीठ स्थापन होणे, महाराष्ट्र राज्याचा ९ वा विभाग म्हणून कोल्हापूर विभागाची स्थापना होऊन आयुक्तालयासह सर्व विभागीय शासकीय कार्यालयांची स्थापना व्हावी, कोल्हापुरात मोठे उद्योग आणणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा मध्ये इंजिनिअरिंग अँड फौंड्री हबचे शाशन मान्यता घेणे. आयटी पार्कसाठी शंभर एकर भूखंड उपलब्ध होणे व कोल्हापूरची आयटी पार्क अशी नविन ओळख निर्माण करणे, विजेचे दर कमी होणे, मेडिकल हब, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण व खेळाडू या विषयाकरिता लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, प्रशासन यांच्या सहकार्याने मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट येणा-या कालावधीत सक्रियपणे कार्य करणार आहे तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व औद्योगिक असोसिएशन्सचे फेडरेशन स्थापन करण्याचा मानस आहे. ’
स्मॅकचे माजी चेअरमन पद्माकर सप्रे, आर. बी. थोरात, दिलीप लडगे, अतुल पाटील, शेखर कुसाळे, बदाम पाटील, इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, आयआयएफचे अध्यक्ष विनय खोबरे, सीआयआयचे उपाध्यक्ष सारंग जाधव, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.