रग्गेडियन कोल्हापूर रन मॅरेथॉन रविवारी, पाच हजार स्पर्धकांचा सहभाग
schedule05 Feb 25 person by visibility 217 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रग्गेडियन कोल्हापूर रन मॅरेथॉन स्पर्धा रविवारी, (९ फेब्रुवारी २०२५) रोजी कोल्हापुरात होत आहे. यंदा या स्पर्धेत पाच हजार स्पर्धक सहभागी होतील.अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण आणि रगेडीयन क्लबचे आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही मॅरेथान स्पर्धा त्यादिवशी सकाळी सहा वाजता सुरू होईल. पहाटे ६ वाजता सुरू होणार आहे. यामध्ये २१ आणि १० किलोमिटर रन सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे तर ५ किलोमीटर रन ही सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
ही मॅरेथॉन ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये होईल. यासाठी वयोगट पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये अठरा वर्षाखालील, १८ ते ३० वर्षे वयोगट, ३१ ते ४५ वर्षे वयोगट, ४६ ते ६० वर्षे वयोगट आणि साठ वर्षावरील अशी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग, रेसचे फोटो आणि अल्पोपहार दिला जाईल.इच्छुकांनी नोंदणीसाठी रगेडियन जिम, येथे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी www.ruggedian.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ७७२२०६७४७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेसाठी डी. वाय. पाटील ग्रुप, एस.जे. आर टायर,आणि डीकॅथलॉन ,रेडिओ मिर्ची यांचे सहकार्य लाभले आहे.या रन मधे कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पत्रकार परिषदेला आशिष तंबाके,अदित्य शिंदे उपस्थित होते.