राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे विषयावर मंगळवारी गोलमेज परिषद, शिवाजी विद्यापीठात आयोजन
schedule25 Nov 24 person by visibility 256 categoryशैक्षणिकलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर गोलमेज परिषद होणार आहे.
मास कम्युनिकेशन अधिविभागात सकाळी अकरा वाजता होणार्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन असणार आहेत. या परिषदेत शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागाचे प्रमुख आणि वेगवेगळ्या विषयांचे प्राध्यापक तसेच कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ संपादक, पत्रकार सहभागी होणार आहेत. ही परिषद सर्वांसाठी खुली असून यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केले आहे.