कळंब्यात स्थानिक शेती पिके-रानभाज्या प्रसिद्धी उपक्रम
schedule21 Sep 24 person by visibility 197 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कळंबे तर्फ ठाणे गावामध्ये पोषण माह अंतर्गत स्थानिक शेती पिके व रानभाज्या प्रचार प्रसिद्धी उपक्रम उत्साहात साजरा झाला. स्थानिक शेती पिके व रानभाज्या प्रचार प्रसिद्धी करणे व त्यापासून कुपोषण मुक्तीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध पाककृतींचे प्रदर्शन करणे हा उपक्रम घेण्यात आला उपक्रमास उपस्थित पालकांना पोषणमाह उद्दिष्टे व स्थानिक रानभाज्या व स्थानिक पिके यांची ओळख व त्यापासून मिळणाऱ्या पोषण संबंधी माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम कळंबे तर्फ ठाणे गावातील सर्व अंगणवाडी स्तरावर ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमास करवीरचे प्रकल्प अधिकारी राहूल निपसे, पर्यवेक्षिका एन व्ही मुजावर, सरपंच सुमन गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.