राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण
schedule17 Sep 24 person by visibility 213 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने सभासदांच्या गुणवत्ताप्राप्त मुलींना पद्माराजे पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त सभासद सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. साहित्यिक डॉ. संजय कमळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाला. आरोग्य उपसंचालक दिलीप माने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वारणा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बँकेचे अध्यक्ष एम. एस पाटील यांनी बँकेच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच बँकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी साहित्यिक कमळकर म्हणाले, ‘मुलांचे करिअर घडविताना अभ्यासासोबत संस्कार महत्वाचे आहेत. संस्काराची पहिली शाळा म्हणजे कुटुंब आहे. यामुळे कुटुंबातील संवाद हरवू नये.’
आरोग्य उपसंचालक दिलीप माने म्हणाले, ‘सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी सकारात्मक वृत्तीने जगावे. निरोगी, तणावमुक्त जीवनशैली अंगिकारावी.’याप्रसंगी गुणवत्ताप्राप्त मुलींना पद्माराजे पारितोषिक देण्यात आली. बँकेचे माजी अध्यक्ष छन्नुसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ दहावी आणि बारावी परीक्षेत अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक रवींद्र पंदारे, शशिकांत तिवले, रोहित बांदिवडेकर, अतुल जाधव, विलास कुरणे, रमेश घाटगे, संजय खोत, सदानंद घाटगे, अजित पाटील, किशोर पोवार, हेमा पाटील, मनुजा रेणके, प्रकाश पाटील, दीपक पाटील, गणपत भालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष अरविंद आयरे यांनी आभार मानले.