कोल्हापुरात पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदली
schedule08 Dec 24 person by visibility 285 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक जाधव आणि गडहिंग्लज येथील पोलिस निरीक्षक सतीश होडसर यांची शनिवारी (७ डिसेंबर २०२४) तडकाफडकी बदली करण्यात आल्या.
या चौघांची पोलिस मुख्यालय येथे नियुक्त्या झाल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ही कार्यवाही केली. मटका व अवैद्य धंद्याविरोतील कारवाईत कुचराई झाल्यामुळे या बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान शाहूपुरी पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक संतोष डोक, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार श्रीराम कणेरकर तर गांधीनगर पोलिस ठाण्याचा सहायक निरीक्षकपदाचा कार्यभार सागर वाघ यांच्याकडे दिला आहे.