Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चौथी - सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिलला भाजपतर्फे जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी सोमवारपासून मुलाखती प्रभाग बारामधून जितू सलगरची माघार, महायुतीला पाठिंबा राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहराव्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे ! हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला कोल्हापुरात प्रतिसाद, लोकवर्गणीतून जमली कोट्यवधीची रक्कममहायुतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री येणार, महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल संयमी नेतृत्वाचे, विकासात्मक व्हिजन विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचे

जाहिरात

 

वीज कंत्राटी कांमगारांच्या प्रलंबित मागण्या सुटाव्यात, संघटनेची नव्या सरकारकडे मागणी

schedule26 Nov 24 person by visibility 381 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वीज कंत्राटी कांमगारांच्या प्रलंबित मागण्या सुटाव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. 

संघटनेने पत्रकात म्ह्टले आहे, ‘महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत तत्कालिन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी  बैठक घेन संघटनेला खूप सहकार्य केले. त्यांनी अनेक समस्यांवर तोडगे काढले १९ टक्के पगार वाढ दिली.  वीज कंपनीतील अधिकाऱ्यांनी कामगार हितार्थ काही चांगली परिपत्रके काढली. मात्र १९ टक्के पगारवाढी बाबत जी परीपत्रके काढली ती जाणीवपूर्वक चुकीची  काढली का ? याची चौकशी करून यात पुन्हा दुरुस्ती करून नवीन परिपत्रके काढण्याची सूचना नवीन ऊर्जामंत्री यांनी प्रशासनाला करावी अशी कामगार हितार्थ पहिली मागणी करणार असल्याचे अध्यक्ष निलेश खरात यांनी कळवल.

नवीन महायुती सरकार संपूर्ण बहुमताने आले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन नवीन ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात संघटनेला स्कारात्म सहकार्य करतील व कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास महामंत्री सचिन मेंगाळे संघटनेने व्यक्त केला. खरात, मेेंगाळे याच्यासह प्रदेश कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes