नैसर्गिक प्रसूती वाढण्याची गरज, मिडव्हाइब संकल्पना उपयुक्त : वैद्यकीय परिषदेमध्ये उमटला सूर
schedule24 Nov 24 person by visibility 66 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्त्रियांचा नैसर्गिक प्रसूतीकडे कल वाढण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्त्रियांची मानसिक तयारी करणे गरजेचे आहे. यासाठी मिडव्हाईब संकल्पना उपयुक्त ठरेल असे मत हैराबादच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ.एव्हीटा फर्नांडिस यांनी केले. कोल्हापूर स्त्री व प्रसूती संघटनेच्यावतीने आयोजित "ग्लोरीयस २०२४ " या वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल सयाजी येथे करण्यात आले होते. या परिषदेत डॉ. एव्हीटा फर्नांडिस यांनी हाय रिस्क प्रेग्नेंसी यावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या," उशिरा होणारी लग्न, बदललेली जीवनशैली, गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे वाढते प्रमाण यामुळे स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्या प्रसुतीसाठी सक्षम नसतात. त्यामुळे गर्भधारणेनंतर योग्य ती काळजी त्या घेत नाहीत. म्हणून प्रसूतीवेळी त्यांना सिझेरियन हा पर्याय अवलंबावा लागतो. परंतु त्यामुळे नैसर्गिक प्रसूती करण्याचे प्रमाण सध्याच्या काळात कमी झालेले आहे. नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी मिडव्हाईब ही एक नवीन संकल्पना डॉ. एव्हीटा फर्नांडिस यांनी हैदराबाद येथे राबवली आहे. यामध्ये पूर्वीच्या काळी सुईण प्रसूती करायच्या त्याचप्रमाणे आत्ता अंगणवाडी सेविकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले असून महिलेच्या गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंत या सेविका तिच्या आहार व योग्य व्यायामाची काळजी घेतात. यामुळे नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण वाढलेले आहे.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद हलकर्णीकर यांनी स्त्रियांचे आजार, प्रसूतीदरम्यान येणाऱ्या समस्या, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसेच बाळ जन्माला आल्यानंतर अर्भकाच्या समस्या या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन झाले. त्यामुळे नवनवीन प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक उपचार पद्धती यांची देवाण-घेवाण परिषदेमधून झाली असेच नमूद केले.
या परिषदेच्या निमित्ताने राज्यात प्रथमच यावर्षी थ्रीडी रोबोटिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियांद्वारे गरीब व गरजू अश्या दहा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ दिला.सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवला जातो. असे परिषदेचे सचिव डॉ. इंद्रनिल जाधव यांनी सांगितले. परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.मनिषी नागांवकर. गौरी साईप्रसाद, खजानिस डॉ. रणजीत किल्लेदार व सहसचिव डॉ.अपर्णा कौलवकर,डॉ. अमोल आपटे उपस्थित होते. परिषदेसाठी सातारा, कराड, सांगली, इस्लामपूर, इचलकरंजी, अकलूज, रत्नागिरी येथून ३५० हून स्त्रीरोगतज्ञ सहभागी होणार आहेत. शिवाय २०० हून अधिक डॉक्टर्सनी ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावली.