मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; शिवसेनेकडून साखर - पेढे वाटप
schedule04 Oct 24 person by visibility 266 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर - पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महिला आघाडीच्या सौ.मंगलताई साळोखे, पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, राधिका पारखी, प्रसाद चव्हाण, अर्जुन आंबी, प्रभू गायकवाड, सचिन पाटील, कपिल सरनाईक, बबनराव गवळी, श्रीकांत मंडलिक, सुरज धनवडे, विकास शिरगावे, रियाज बागवान, सुभाष भोसले उपस्थित होते.
........
"आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा मायमराठीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. याचा सर्वस्वी आनंद आणि अभिमान आहे. समस्त मराठी जणांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत आहे. "
- राजेश क्षीरसागर, कार्याध्यश राज्य नियोजन मंडळ