कलानिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मनोज दरेकर
schedule01 Oct 24 person by visibility 536 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील कलानिकेतन शिक्षण संस्थेच्या रा शी गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मनोज दरेकर यांची संस्थेने एकमताने निवड केली. प्रा. दरेकर यांनी गेली २६ वर्ष कलानिकेतन महाविद्यालयमध्ये अध्यापन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी घडले आहेत.दरेकर हे चित्रकार, छायाचित्रकार, स्तंभ लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे.राज्य सरकारच्या उपयोजित कला विभागाच्या विविध समित्यांवर कार्यरत आहेत. कोल्हापुरातील अनेक कला उपक्रम यशस्वी होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय जाधव सचिव राजेंद्र राऊत, संचालक व्यंकटेश बिदनुर , अमृत पाटील, विजय टिपुगडे, रघु जाधव, संजीव संकपाळ, संजय शेलार, अतुल डाके, गौरी चोरगे यांचे प्रोत्साहन लाभले.