अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी व्याख्यान
schedule02 Oct 24 person by visibility 167 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संस्थेच्या १०४ व्या वर्धापनदिनानिमित्त माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे विश्वगुरू भारत या विषयावर व्याख्यान आयोजित केेले आहे. शनिवारी, (पाच ऑक्टोबर २०२४) सायंकाळी चार वाजता वाय पी पोवार स्मृति रंगमंच येथे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचा ६३ वा वर्धापनदिनही साजरा करण्यात येणार आहे.
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अद्श्य काडसिद्धेश्वर स्वामी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन उदय सांगवडेकर, कार्यवाह शरयू डिंगणकर यांनी केले आहे.