Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण थथसमिधा प्रतिष्ठानतर्फे महिला दिन-पुरस्कार वितरण समारंभ उत्साहातमहायुतीचे नेते म्हणतात राज्याचा अर्थसंकल्प लोकाभिमुख ! काँग्रेसच्या आमदारांचे टीकास्त्र !!वालावालकर हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्थोपेडिक सर्जन सेवासिद्धगिरी रुग्णालयात दुर्बिणीच्या सहाय्याने बायपास शस्त्रक्रिया!गुरु- शिष्य कला प्रदर्शन 15 मार्चपासून, युवा कलाकार पुरस्कार सुदर्शन वंडकरनाप्रत्येक दिवस नारीशक्तीचाच - रोहिणी आबिटकर शिवाजी विद्यापीठात बुधवारी शरण अध्यासनतर्फे कार्यशाळा नाइट कॉलेजमध्ये भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप याविषयी चर्चासत्रशक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक

जाहिरात

 

२७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा

schedule24 Sep 24 person by visibility 1437 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर ते अहमदाबाद या मार्गावर २७ ऑक्टोबर २०२४ पासून थेट विमानसेवा सुरू होत आहे.  खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही सेवा सुरू राहणार आहे.
  कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उडाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोचेल. तसेच अहमदाबादहून १२ वाजून ४५ मिनिटांनी विमान उडेल आणि २ वाजून ५ मिनिटांनी कोल्हापुरात पोचेल. त्यासाठी तिकीटाचे बुकींग सुरू आहे.
कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणार्‍या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी होती. खासदार  महाडिक यांनी, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली.या विमान सेवेमुळे अहमदाबाद सोबतच संपूर्ण गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेने कनेक्ट होणार आहे, अशी माहिती खासदार  महाडिक यांनी दिली.
कोल्हापूरच्या विमानसेवेचा आता गतीने विस्तार होत आहे. कोल्हापूरहून तिरूपती विमान सेवा सुरू झाली आहे.  सध्या कोल्हापूर- बेंगलोर, कोल्हापूर - हैद्राबाद, कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर- तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे महाडिक यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes