Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !

जाहिरात

 

कबाब फॅक्टरी, इटालियन पिझ्झा अन् फिशची व्हरायटी

schedule24 Jul 22 person by visibility 1302 categoryलाइफस्टाइल

शिये फाटा येथील हॉटेल रॉयल व्हेनेशियन ठरतेय ग्राहकांच्या आकर्षणाचे फूड मॉल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
बिर्याणी हंडीत तयार केलेले चिकन मटण, कोळशावर तयार केलेले तंदुरी चिकन,इटालियन पिझ्झा, देशाच्या विविध भागातील शेफ व कूक आणि त्यांनी बनविलेल्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून व्हरायटी ऑफ टेस्ट चाखण्याची संधी आणि शनिवारी-रविवारी फिशची व्हरायटी हे सारं काही उपलब्ध असणार ! आण जे चवीन खाणार त्यांच्यासाठी हक्काचं आणि आवडतं ठिकाण म्हणजे, हॉटेल रॉयल व्हेनेशियन ! !
शिरोली एमआयडीसी, शिये फाटा येथील हॉटेल रॉयल व्हेनेशियन हे चोखंदळ खवय्यांचे आवडत फूड मॉल ठरले आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि प्रतिष्ठेला शोभेल असा हा फूड मॉल कोल्हापुरात दोन वर्षांपूर्वी सुरु झाला. ग्राहकांच्या प्रतिसादाच्या बळावर , हॉटेल रॉयल व्हेनेशियन आता तिसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. सुंदर व नयनरम्य वातावरणात असलेला फूड मॉल हा आकर्षण ठरला आहे.
 हॉटेल रॉयल व्हेनिशयनची रचना सुबक आणि वैशिष्ट्यूपूर्ण अशी आहे. दोन प्रशस्त रेस्टॉरंट एक म्युझिकल पब, सव्वाशे लोकांचा बँक्वेट हॉल, लश ग्रीन लॉन हे नागरिकांच्या पंसतीस उतरले आहेत.
हॉटेल रॉयल व्हेनेशियनने प्रारंभापासूनच उत्तम ग्राहक संकल्पना, उत्तम सेवा जपली आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी जपल्या आहेत. त्यानुसार शुद्ध जेवण बनवून देतात. उत्तम प्रकारचे घरगुती पनीर, घरगुती तूप, उच्च प्रतीचा बासमती तांदूळ यामुळे ग्राहकांची, खवय्यांची पावले आपसूक इकडे वळतात.
“गोदरेज ब्रँडचे चिकन व गावटान चिकन ठटाविक पोल्ट्रीतूनच आयात केले जाते. ठराविक भागातूनच मागवलेलं पालव्याचे मटण की
ज्याच्या चवीत फरक कधीच जाणवणार नाही’’असे हॉटेल व्यवस्थापनचे म्हणणे आहे.
जेवणासाठी कोलेस्ट्रॉल फ्री शुद्ध भुईमुगाचे तेल वापरले जाते. उच्च दर्जाचं तयार केलेल्यामुळे जेवणामुळे विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. देशाच्या विविध भागातून आणलेले किचन मधील "शेफ व कुक" व्हरायटी ऑफ टेस्ट ग्राहकांना देत असतात. "बारमेन" विविध प्रकारच्या कॉकटेल्स मॉकटेल्स करून देत असतात. इंग्लिश संकल्पना संपूर्ण वूडमध्ये तयार केलेला पब बार आणि त्यासोबत कबाब फॅक्टरी. रॉयल व्हेनेशियनची कबाब ही स्पेशालिटी. आणि या सर्वांच्या सोबतीला दिलखेचक म्युझिकची साथ आहे. शनिवार आणि रविवारी प्रॉन्स गसीकरी, प्रॉन्स फ्राय, पात्रा फिश आणि फिश टिक्का यामुळे सुट्टीदिवशी एकत्रितपणे हॉटेल रॉयल व्हेनेशियन’ला प्राधान्य देत असल्याचं ग्राहकांचे म्हणणे आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 7823025133/8007399001/9325695901/9325699001 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 …………….

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes