महाराष्ट्र चेंबर कन्स्ट्रक्शन समितीच्या को-चेअरमनपदी जयेश ओसवाल
schedule01 Aug 24 person by visibility 666 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या रियल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन समितीच्या को-चेअरमनपदी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक जयेश ओसवाल यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही निवड केली. या समितीच्या चेअरमनपदी सुनील कोतवाल (नाशिक), उपाध्यक्षपदी दिलीप गुप्ता (पुणे) यांची निवड झाली आहे. ओसवाल हे सध्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव म्हणून कार्यरत आहेत.