Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !

जाहिरात

 

गांधीनगरात भाजपच्या सरपंचासह चौघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ! आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश !!

schedule01 Aug 24 person by visibility 816 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गांधीनगर येथील भारतीय जनता पक्षाचे सरपंच संदीप पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे यांच्यासह चौघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी (१ ऑगस्ट २०२४) रोजी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झााला. गांधीनगर येथील सिंधी सेंट्रल पंचायत येथे मेळावा झाला. यावेळी सचिन जोशी, राजू चंदनशिवे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
‘ राज्यात, केंद्रात काँग्रेसची सत्ता नसतानाही लोक आमच्या गटात सहभागी होत आहेत. याबद्दल विरोधकांनी आत्मपरीक्षीण करावे.’असा टोला आमदार सतेज पाटील यांनी भाजपला लगाविला. गांधीनगरच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करुन देऊ.  आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी लवरकच गांधीनगरला मिळेल असे त्यांनी सांगितले.  
   दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी गट-तट न पाहता  गांधीनगरचा विकास करण्यावर आपला भर राहील असे सांगितले. सरपंच संदीप पाटोळे यांनी ‘गांधीनगरच्या विकासासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.’असे सांगितले. सचिन जोशी,  सदस्य गजेंद्र हेगडे, निवास तामगावे, कपिल घाडगे, प्रल्हाद शिरोटे, आशिष पाटील यांची भाषणे झाली. याप्रसंगी  उपसरपंच विनोद हुजराणी, ग्रामपंचायत सदस्य रियाज सनदी, सनी चंदवानी, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, गोवलदास कट्यार, सेवाराम तलरेजा, दिलीप कुकरेजा, प्रकाश चंदवानी, अशोकराव तेलानी, अशोक निगडे, सतिश घाटगे, बजरंग रणदिवे उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes