Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंद्रकांत पाटील उच्च-तंत्रशिक्षणमंत्री, प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री, मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षणज्ञानेश्वर मुळे, विठ्ठलराव याळगींना पुरस्कार ! रविवारी वितरण समारंभ !!डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुक

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे

schedule16 Sep 24 person by visibility 550 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ केमिस्ट सभासदांनी आपल्या व्यवसायात होणाऱ्या बदलांचे अनुकरण करवून अपग्रेड व्हावे. केमिस्ट असोसिएशन कोल्हापूरच्या सभासदाभिमुख योजना व विविध उपक्रमांना पाठबळ देऊ ’अशी ग्वाही अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले. 
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.  महासैनिक दरबार हॉल येथे सभा झाली. या सभेत शिंदे बोलत होते. याप्रसंगी केमिस्ट असोसिएशन कोल्हापूरतर्फे शिंदे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सभेमध्ये संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  सभेसाठी १८०० पेक्षा जास्त संख्येने सभासद उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. 
 असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी भाषणात सस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेकडून सभासदांसाठी पुढील काळाता हाती घेतलेल्या कामाची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना अध्यक्ष शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे सभेत ठरले. यामध्ये संघटनेच्या माध्यमातून, सभासद व त्याच्या कुटुबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणे,वैद्यकीय उपचार कमीत कमी खर्चात मिळावेत यासाठी प्रयत्न करणे, गरजू गरीब रुग्णांना मोफत औषध पुरवठा, मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन व मोफत औषध पुरवठा,सामाजिक वनीकरण ,अत्यावश्यक गरीब रुग्णास रक्त पुरवठा,अंध व्यक्तीना अत्यावश्यक साधने पुरवणे ,पायी दिंडी मध्ये जाणाऱ्या वारकऱ्याना लागणारी औषध पुरवठा अशा उपक्रमांचा समावेश आहे. 
 याप्रसंगी  प्रसाद दानवे,   विजय पाटील,  दिलीप कदम,  रवींद्र पाटील,  शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, किरण जाधव, संदीप मिसाळ, सदा पाटील,   मोहन ढेरे, सचिन पाटील,  अशोक बोरगांवे,  महेश सावंत, भुजिंगराव भांडवले यांची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनचे   सचिव प्रल्हाद खवरे यांनी प्रास्ताविक केले. शीतल कांबळे व दीपक वाडकर यांनी सूत्रसंचालन केले.  उपाध्यक्ष  संदीप मिसाळ यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes