महापालिकेच्या कामगारांना पावसाळी रेनकोट वाटप
schedule03 Jul 24 person by visibility 516 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २६ येथील महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आजरेकर फाउंडेशनतर्फे पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले.
तीन जुलै रोजी मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस असतो. आजरेकर फाउंडेशनमार्फत यंदाही समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले आहे . पावसाळ्याच्या आगमनामुळे सफाई कर्मचाऱ्यांना भिजत काम करावे लागते, त्यासाठी त्यांना पावसाळी रेनकोट प्रदान करण्यात आले.
यावेळी मुस्लिम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर, मधुकर शिंदे, प्रशांत खाडे , अमर माने ,अभिजीत सूर्यवंशी ,विकी पंडत,मुस्तफा मणेर , राजू हांडे, मिहीर शेख व भागातील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते . आजरेकर फाउंडेशन अध्यक्ष अशपाक आजरेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम करण्यात आला.