गोकुळतर्फे पूरग्रस्त छावणीतील जनावरांना पशुखाद्य वाटप, शिरोळ तालुक्यात वितरण
schedule31 Jul 24 person by visibility 335 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त छावणींतील जनावरांना पशुखाद्य वाटप करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालकाच्या उपस्थितीमध्ये तब्बल बारा टन पशुखाद्य छावणीतील जनावरांसाठी वितरित केले. संचालकांनी, जनावरांच्या छावणीला भेट दिली.
महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी यांनी सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्याच्या आवारात व गोडाऊनमध्ये स्थलांतरीत केलेली आहेत. त्याकरिता गोकुळकडून गुरुदत्त शुगर्स येथील छावणीला आठ टन पशुखाद्य तसेच पार्वती सूतगिरणी मौजे तेरवाड येथील छावणीतील २०० जनावरांना चार टन पशुखाद्य वाटप केले.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, गुरुदत्त शुगरचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगले, बाळासाहेब पाटील व रमेश बुजुगडे, जवाहर पाटील, गोकुळचे अधिकारी मानसिंग देशमुख, आर.व्ही.पाटील, अशोक पाटील, सुहास डोंगळे, गुरुदत्त शुगरचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले उपस्थित होते.
................
“ गोकुळने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. महापुरामुळे अनेेक भागात जनावरांचे स्थलांतर झाले. जनावरांच्या छावण्या आहेत. गोकुळतर्फे त्या छावणीतील जनावरांनकरिता पशुखाद्य वाटप करण्यात आले आहे. तसेच जनावरांच्या चारा कुटीसाठी ही गोकुळमार्फत लोडर चाफकटर उपलब्ध करून देण्यात येईल. या महापुराने अनेक मुक्या जनावरांना गुरुदत्त शुगर्स समूह तसेच पार्वती सूतगिरणीने दिलेला आधार हा मोलाचा आहे.’’
- अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ दूध संघ