Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आनंदी जीवनासाठी वाईटाचा त्याग अन् चांगल्याचा स्वीकार करा : इंद्रजित देशमुखकोल्हापुरात रविवारी होमिओपॅथी परिषदशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, शिवप्रेमींची शुक्रवारी बैठकपीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : शिक्षण सहसंचालक धनराज नाकाडेशेतकऱ्यांची मुंबईत धडक !  आझाद मैदान गरजला एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द !!महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!! सारस्वत विकास मंडळातर्फे महिलांचा सन्मानशिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणामंत्र्यांसोबत बैठककेआयटीमध्ये गुरुवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानविद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली रंग

जाहिरात

 

ग्रामपंचायतींना घनकचरा संकलनासाठी ई घंटागाड्यांचे वितरण

schedule23 Sep 24 person by visibility 378 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापॅूर : घनकचरा संकलनासाठी ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या ई घंटागाड्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
     स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सत्तर टक्के निधी उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायतींनी मागणी नोंदविल्यानुसार जिल्ह्यातील ४६ ई घंटा वाहनांचा पुरवठा राज्य स्तरावरुन करण्यात येत आहे. यापैकी राज्याकडुन प्राप्त झालेल्या प्रतिनिधिक स्वरुपातील दोन ई घंटागाड्यांचे वितरण पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत आरळे व शाहूवाडी तालुक्यातील थेरगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, जिल्हा समन्वयक तथा प्रकल्प संचालक माधुरी परीट, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर नॅडेफ, गांडुळ खत, कचरा वर्गीकरण शेड, तालुका स्तरावर प्लॅस्टिक प्रकीया केंद्र या प्रकल्प यंत्रणा उभारल्या आहेत. या प्रकल्पामध्ये प्रत्येक घरातून तयार होणारा घनकचरा वर्गीकरण करुन, त्याचे खतात रुपांतर होण्यासाठी, कचऱ्याची प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून ई- घंटागाड्या पुरविण्यात येत आहेत.  यावेळी या ई घंटागाड्यांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केली. तसेच गावातील कचरा संकलन करताना कुटुंब स्तरावरच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes