Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!

जाहिरात

 

प्रतापराव होगाडे यांचे निधन

schedule18 Nov 24 person by visibility 1021 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :  समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष व  सहकार, सामाजिक व पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रतापराव होगाडे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षाचे होते. वीज तज्ञ म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. जनता दलात ते अनेक वर्ष सक्रिय होते. इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळाचे संस्थापक  होते. विविध क्षेत्रात सक्रिय सहभाग असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. ते महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष होते. सामाजिक, संस्कृतिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग असायचा. शेती, वीज यासंबंधी झालेल्या आंदोलनात ते अग्रभागी असायचे. अभ्यासपूर्ण वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मंगळवारी १९  नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता दाते मळा,सुंदर बाग परिसरातील त्यांच्या राहत्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes