खाजगी प्राथमिक शिक्षक समितीची चिपळूणला शिक्षण परिषद
schedule12 Sep 24 person by visibility 213 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्यावतीने चौदा व पंधरा सप्टेंबर 2024 रोजी शिक्षण परिषद व कोकण विभागीय शिक्षक मेळावा आयोजित केला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली आहे
. राज्याध्यक्ष रसाळे यांनी सांगितले की प्रत्येक वर्षाप्रमाणे आमच्या संघटनेची यावर्षी कोकण विभागामध्ये शिक्षण परिषद होत आहे. याचे नियोजन रत्नागिरी जिल्हा शाखेने केले आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी (योजना ) डॉ किरण लोहार यांच्या हस्ते होणार आहे. पाहुणे म्हणून पंचायत समिती चिपळूणचे शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई व पुणे येथील संतोष शिळीमकर आहेत.
15 सप्टेंबर रोजी शिक्षण परिषदेच्या सत्र दोनचे उद्घाटन
रत्नागिरी जिल्हा डाएट चे प्राचार्य . डॉ . सुशील शिवलकर यांच्या हस्ते होत आहे. धुळे येथील अंजन पाटील हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याध्यक्ष भरत रसाळे ( कोल्हापूर ) राज्य संघटक बादशहा जमादार (जयसिंगपूर ) राज्य सचिव शशिकांत माळी (सांगली )हे उपस्थित राहणार आहेत यावेळी "शिक्षणाचे बदलते स्वरूप व शिक्षकाची भूमिका "या विषयावर डॉ . सुशील शिवलकर हे विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर संघटनेची शिक्षण विषयक खुली चर्चा होऊन शैक्षणिक ठराव मांडण्यात येणार आहेत . तसेच नवीन पदाधिकारी निवडीही या मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहेत.