करवीरमध्ये चंद्रदीप नरके विजयी ! निसटत्या पराभवाने पाटील गटाला चटका !!
schedule24 Nov 24 person by visibility 52 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा वाढीस लागलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघाची लढत शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी जिंकली. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील विजयी होतील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र या मतदारसंघात पाटील यांना १९७६ मतांनी पराभव पत्करावा लागला. हा निसटता पराभव पाटील गटाला चटका लावणारा ठरला.
करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना एक लाख ३४ हजार ५२८ तर राहुल पाटील यांना एक लाख ३२ हजार ५५२ मते मिळाली. संताजी घोरपडे यांना ७९३१ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण २ लाख ७६ हजार २४५ इतके मतदान झाले होते. २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. करवीर विधानसभा मतदारसंघात गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. नरके यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली.
करवीरमध्ये चंद्रदीप नरके विजयी ! निसटत्या पराभवाने पाटील गटाला चटका !!वीस फेऱ्यापर्यंत नरके यांच्याकडे आघाडी होती. या पुढील फेरीत राहुल पाटील यांनी चांगले मते घेत पिछाडी भरुन काढली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या तर नरके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली. शेवटच्या फेरीत काय घडणार ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या. या फेरीतील मताधिक्क्याच्या आधारे नरके हे १९७६ मतांनी विजयी झाले.