चेंबर चषक इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनने जिंकला ! कोल्हापूर जिल्हा सराफ संघ उपविजेता!!
schedule19 Jan 25 person by visibility 314 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : झंवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन संघाने जिंकला. अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा सराफ संघावर विजय मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन हा संघ चषकाचा मानकरी ठरला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन संघाने ८ षटकांत ५ बाद ९७ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचा डाव ३ गड्यांच्या मोबदल्यात ७१ धावांवर आटोपला आणि इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशनने अंतिम सामना २६ धावांनी जिंकला. विजेत्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन व उपविजेत्या कोल्हापूर जिल्हा सराफ संघाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी व झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र झंवर यांच्या हस्ते तसेच कार्यकारी संचालक नीरज झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालिकावीर व अंतिम सामन्याच्या सामनावीरचा पुरस्कार सुरज तिवले, उत्कृष्ट गोलदांज निरंजन रतवाल, तर उत्कृष्ट फलंदाज चा पुरस्कार साहील जैस्वाल याने पटकाविला.
दरमान्य पहिल्या उपांत्यपूर्व झालेल्या सामन्यात इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशनने ने गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनला ला नमविले. तर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन संघाने दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशन संघाला ला नमविले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशनच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन ने बाजी मारत अंतिम सामन्यात धडक दिली तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर जिल्हा सराफ संघाने दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन संघाला नमवत अंतिम सामन्यात धडक दिली. अटीतटीच्या या सामन्यात इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन संघाने कोल्हापूर जिल्हा सराफ संघावर विजय मिळवत चेंबर चषक २०२५ वर आपली मोहोर उमटविली.
यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष राजू पाटील, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, खजिनदार राहुल नष्टे, क्रिकेट कमिटीचे चेअरमन संपत पाटील, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, संचालक अनिल धडाम, अविनाश नासिपुडे, इंद्रजित चव्हाण, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, अमित आर मेडिकल चे पार्टनर दादासो कडवेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रसाद पाटील, संजय घोडावत ग्रुपचे सलमान शेख, रिटा आईस्क्रिम फॅक्टरीचे रमेश लालवाणी, सनी मेडिकेअर एलएलपीचे पार्टनर राज शेटे उपस्थित होते. तौफीक मु्ल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत शिंदे यांनी आभार मानले.