शुक्रवारपर्यंत सर्व संबंधित विभागाने डेटा अपलोड करावा - एस कार्तिकेयन
schedule19 Mar 25 person by visibility 168 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तसेच विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये समन्वय /कार्यक्षमता वाढविणे त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासाच्या विविध पद्धती एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करणे या उद्देशाने प्रधानमंत्री गति शक्ती योजना केंद्र शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने येत्या शुक्रवार पर्यंत सर्व संबंधित विभागांनी आपला डेटा जीआयएस पोर्टलवर अपलोड करावा असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री गती शक्ती योजनेची जिल्हा समन्वय समितीची आज पहिली बैठक पार पडली ते पुढे म्हणाले, नवीन प्रकल्प तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने पीएम गती शक्ती पोर्टलवर माहिती उपलब्ध करुन द्यावी जेणेकरून सर्व कामांमध्ये सुसूत्रता येईल. जिल्हा मास्टर प्लॅन सह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनासाठी माहिती आणि साधने प्रदान करण्याच्या उद्देशाने ही जिल्हा समन्वय समिती स्थापन झाली आहे. या आढावा बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, संशोधन अधिकारी डॉ. अरुण धोंगडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अ.ता .पाटील, एमआयडीसीचे गौरव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुहास वायचळ, नगररचना विभागाचे अनिकेत महाजन आदी उपस्थित होते.