कॉमर्स कॉलेजमध्ये पारपंरिक दिन उत्साहात
schedule04 Oct 24 person by visibility 264 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव' व 'शाही दसरा' या निमित्ताने देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मराठी संस्कृती तिचे महत्त्व, मराठी संस्कृतीची जपणूक,मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला,याविषयी प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक सर यांनी प्रबोधन केले.
या प्रसंगी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विदयार्थी विद्यार्थिनी, शिक्षकांनी विविध मराठी पोशाख परिधान करून पारंपरिक दिन साजरा केला. कार्यक्रमास, उप प्राचार्य डॉ. बन्ने, पार्वती मंच समन्वयक डॉ. सुप्रिया चौगुले कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्हडंकर, पर्यवेक्षक डवंग आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.