Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!

जाहिरात

 

चित्रकार एस निंबाळकर यांचे निधन

schedule14 Nov 24 person by visibility 1034 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  येथील  सुप्रसिद्ध चित्रकार सूर्यकांत निंबाळकर (वय ७१) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते एस. निंबाळकर या नावाने प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतन येथून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत त्यांनी स्वत:ची शैली निर्माण केली आहे. उत्तम कलावंत म्हणून त्यांनी ओळख मिळविली.

निंबाळकर यांचा जलरंगातील निसर्ग चित्र प्रकारात विशेष हातखंडा होता. त्यांनी काढलेली निसर्ग चित्रे, देवदेवतांची चित्रे तसेच भेटकार्डे जगभर प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार रविंद्र मेस्त्री आणि चंद्रकांत मांडरे यांना ते आपले गुरु मानत. रंग, आकार, मांडणीतील साधेपणा यामुळे तसेच आकारमूल्यांचे सहज सुलभीकरण यामुळे त्यांची चित्रे रसिकप्रिय ठरली. चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरु यासह अनेक ठिकाणी त्यांच्या ५० हून अधिक चित्रांचे प्रदर्शन भरलेले आहे. त्यांच्या कलाकृती लंडन, स्पेन, न्यूयॉर्क या देशासह देशविदेशातील कलारसिक आणि संग्रहालयात संग्रही आहेत. कॅम्लिन, ओक, बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीकडून त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातंवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशान भूमी येथे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes