सिद्धिविनायक मंदिराची शहीद महाविद्यालयामार्फत स्वच्छता
schedule03 Oct 24 person by visibility 256 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या विद्यार्थिनींमार्फत गांधी जयंतीनिमित्त तुरंबे येथील श्री सिद्धिविनायक मंदिराची स्वच्छता करण्यात आली.
्राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. अविनाश पालकर यांनी विद्यार्थिनींना सूचना दिल्या. त्यानुसार विद्यार्थिनींनी स्वच्छता अभियानास सुरुवात केली. यावेळी मंदिरातील कचरा, प्लास्टिक, झाडांचा पडलेला पालापाचोळा मंदिराच्या परिसरातील वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता अभियानासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांचे मार्गदर्शन लाभले.