विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली मेन राजाराम हायस्कूलला भेट
schedule05 Dec 24 person by visibility 117 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मेन राजाराम हायस्कूला भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., तहसीलदार स्वप्नील रावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्रभारी मुख्याध्यापक गजानन खाडे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी मेन राजाराम हायसकूलची इमारत हेरिटेज वास्तू असल्याची माहिती जाणून घेतली. तसेच या हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी या इमारतीचा तसेच येथे असणाऱ्या ध्वजाचा इतिहास जाणून घेतला.