Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभाडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकज मुंडेंची उपस्थितीअन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेगुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटीलभटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

जाहिरात

 

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

schedule16 Nov 20 person by visibility 866 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात बहिरेश्वरवाडी येथे अंत्यसंस्कार झाले. पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान ऋषीकेश यांचे चुलत बंधू पुंडलिक यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान पार्थिव सकाळी सात वाजता बहिरेवाडी येथील निवासस्थानी आले. वडील रामचंद्र जोंधळे, आई कविता , बहीण कल्याणी आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर याठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका- चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे,ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा श्री भैरवनाथ हायस्कूल येथे पोहचली.

  अंत्ययात्रा अंतिम संस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

            सुभेदार सखाराम पवार, माजी आमदार संजय घाटगे, समरजितसिंह घाडगे, जि. प. उमेश आपटे, सरपंच अनिल चव्हाण, उपसरपंच उमेश खोत, कर्नल कुलदिप कुमार कर्नल आर. आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदिप ढोले, कर्नल शिवाजी बाबर आणि आजी माजी सैनिक संघटच्यावतीनेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes