Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएचडीमहापालिकेच्या हद्दवाढीत सहभागी व्हा, तुमची सर्व जबाबदारी घेऊ - महापौर रुपाराणी निकमगोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफपदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाददूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढएक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण !

जाहिरात

 

शिक्षक पतपेढीसाठी लढण्याची तयारी,

schedule20 Dec 23 person by visibility 421 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतपेढी या संस्थेच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सात जानेवारी २०२४ रोजी मतदान होत आहे. १७ जागेसाठी १३३ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. २६ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. गेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या.
कोजिमाशि पतपेढीवर सध्या आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील सुकाणू समितीची सत्ता आहे. सत्तारुढ आघाडीच्या या सुकाणू समितीमध्ये वसंतराव देशमुख, बापूसाहेब शिंदे, के. के. पाटील, उदय पाटील, व्ही. जी. पोवार, संजयसिंह कलिकते व आर. एस. मर्दाने यांचा समावेश आहे.
शिक्षक नेते दादासाहेब लाड व पतपेढीचे माजी चेअरमन विलास साठे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक शिक्षकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.एकूण सतरा जागा आहेत. पतपेढीचे मतदानास पात्र सभासद संख्या १८२० इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक करवीर तालुक्यातील आहेत. करवीरमध्ये ८१० तर शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी २६० सभासद आहेत. कागल तालुक्यात २१०, हातकणंगलेत ११०, गगनबावडा तालुक्यात १०० आहेत. भुदरगडमध्ये २५, शिरोळमध्ये १५, गडहिंग्लजमध्ये दहा, आजरा व चंदगड तालुक्यात प्रत्येकी पाच मतदान आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes